शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूची टेस्ट मेडिकलमध्येच!

By admin | Updated: February 8, 2015 01:16 IST

उपराजधानी स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहे. याचा आढावा घेण्यासाठी नुकतेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी

आरोग्य विभाग देणार पीसीआर यंत्र : सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची ग्वाहीनागपूर : उपराजधानी स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहे. याचा आढावा घेण्यासाठी नुकतेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयला स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्यासाठी असलेले पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर) यंत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यामुळे आता मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या नमुन्यांची तपासणी होणार असून रुग्णाला तत्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे.स्वाईन फ्लूचा आढावा घेण्यासाठी डॉ. सावंत बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी त्याच दिवशी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मेडिकलला भेट देऊन स्वाईन फ्लूची माहिती घेतली. फक्त मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार होत असल्याचे, पण स्वाईन फ्लूच्या नमुन्याची तपासणी मेयोत होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले. नमुने पाठविण्यात होत असलेला उशीर, अहवाल मिळणारा लागत असलेला वेळ लक्षात घेऊन त्यांनी आरोग्यविभागाच्यावतीने पीसीआर यंत्र देण्याची ग्वाही दिली. यामुळे सुमारे ४० लाखांचे हे यंत्र लवकरच मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात असणार आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून संशयित रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे स्वत:ची इस्पितळे असताना स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती केला जात नाही. यामुळे मेडिकलमध्ये रुग्णांचा भार वाढत आहे. दुसरीकडे स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचे नमुने मेयोत पाठविण्यात येतात. परंतु त्याचा अहवाल मिळेपर्यंत बराच वेळ जात असल्याने रुग्णांच्या उपचाराशी दिशा ठरविण्यास वेळ जातो. या धर्तीवर हे यंत्र रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)