शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
3
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
4
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
5
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
6
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
7
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
8
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
9
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
10
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
11
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
12
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
13
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
14
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
15
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
16
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
17
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
18
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
19
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
20
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल

सुशांत सिंह प्रकरण: SCच्या निर्णयानंतर धावपळ वाढली, पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 18:58 IST

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.मुख्यमंत्री आणि परमबीर सिंह यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली.उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुखांच्या भेटण्यासाठी गेले.

मुंबई - अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यात धावपळ वाढली आहे. न्यायालयाने सुशांतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवला आहे. यावर मुंबईचे  पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कसल्याही प्रकारचे विशेष भाष्य केले नाही. मात्र, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. 

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांत जवळपास अर्धातास चर्चा झाली. यानंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेले. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे डीजीपी सुबोध कुमार जायसवाल यांनाही भेटण्यासाठी बोलावले आहे. 

दोन्हीही टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप विशेष अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. बुधवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. जोवर संपूर्ण ऑर्डर वाचत नाही, तोवर यावर काहीही बोलू शकत नाही, असे ते म्हणाले. 

ठाकरे सरकारला घेरण्यास सुरुवात -सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विरोधक ठाकरे सरकारवर आक्रमक झाले आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याच्या निर्णयानंतर भाजपाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते तथा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 'सत्यमेव जयते', असे ट्विट केले आहे. यापूर्वीही त्यांनी सुशांत प्रकरणाची चोकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी केली होती. 

मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह -सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीसही समोरासमोर आले होते. मुंबई पोलिसांनी तब्बल दोन महिने एफआयआर न नोंदवल्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या चैकशीवर विश्वास दाखवला आणि सुशांत प्रकरणावरील राजकारणामागे बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका असल्याचे म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख