शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अपत्यप्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: June 8, 2014 01:47 IST

नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते.

गडचिरोली : नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी आमच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणो सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पणाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नव्हता. शेवटी आत्मसमर्पण करायचे ठरविले आणि अखेर अपत्यप्राप्तीसाठी आम्ही दोघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, अशी माहिती आत्मसमर्पण करणा:या नक्षली दाम्पत्याने पोलिसांना दिली. 
संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (26, रा. खुनेरा, जि. राजनांदगाव छत्तीसगड) आणि शीला ऊर्फ लता गोटा (2क् रा. कोरची, जि. गडचिरोली) असे या आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. नुकतेच त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 
चळवळीत काम करताना दोघांची ओळख झाली. हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. उत्तर गडचिरोली-गोंदियाचा डिव्हिजनल कमांडर पहाडसिंगचा अंगरक्षक असलेल्या संदीपने शीलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. शीलानेही होकार दिला. मात्र चळवळीतील नक्षल्यांचा लग्नाला प्रखर विरोध होता. अखेर सहका:यांचा विरोध झुगारून खुद्द पहाडसिंगने जानेवारी 2क्14 मध्ये संदीप आणि शीलाचे लग्न गडचिरोलीच्या जंगलात लावून  दिले. लग्नानंतर मूल व्हावे, अशी संदीप आणि शीलाची इच्छा होती. मात्र नसबंदीसाठी त्यांच्यावर चळवळीतून दबाव येऊ लागला. 
यापूवीसुद्धा चळवळीतील अनेक युवक-युवतींची जबरीने नसबंदी करण्यात आली होती. मात्र आम्हाला मूल पाहिजे होते. अखेर लग्न लावून देणा:या पहाडसिंगनेच आम्हाला आत्मसमर्पणाचा सल्ला दिला, असे या नक्षल दाम्पत्याने स्पष्ट केले.
चळवळीत युवतींना जबरदस्तीने सहभागी करून त्यांचे लैंगिक शोषण करणो ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच जबरीने नसबंदी होत असल्यामुळे चळवळीतील युवक- युवतींमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया रिओपन करण्याबाबत तयार केलेले पोस्टर आम्ही पाहिले.
 आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात नसंबदी शस्त्रक्रिया पुन्हा खुली  केली जाते व त्यांना अपत्याचा लाभ घेता येतो, ही गोष्ट ऐकली होती, असेही या दाम्पत्याने सांगितले. 
 
च्पहाडसिंगने आपल्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींना या हिंसक चळवळीत ओढले. मात्र आपला अंगरक्षक संदीप आणि शीलाचे लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे, असा सल्ला देणा:या पहाडसिंगने यापूर्वी सुद्धा आपल्या मुलींनी शिकूनसवरून डॉक्टर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.