शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार ठरू शकतो बुमरॅँग’

By admin | Updated: October 15, 2016 03:34 IST

‘सर्जिकल स्ट्राईक’चा प्रचार हा बूमरँंग असतो, याचे अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. मोदी सरकारने स्ट्राईकचा एवढा मोठा गवगवा केला, की त्याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया

पुणे : ‘सर्जिकल स्ट्राईक’चा प्रचार हा बूमरँंग असतो, याचे अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. मोदी सरकारने स्ट्राईकचा एवढा मोठा गवगवा केला, की त्याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया समोर आल्या. जनतेला काय सांगावे काय सांगू नये, याचे भान सरकारला नाही, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.पाकिस्तानमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून लष्करी सैन्याने केलेल्या कामगिरीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसने त्यांच्या काळात केवळ लष्करी कारवाया केल्या असल्याचा दावा केला आहे. त्या विषयी विचारले असता, शिंदे यांनीकाँग्रेसच्या काळात तीन सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुनरूच्चार करुन ते म्हणाले, ‘‘ मी केंद्रीय गृहमंत्री असतानाच एक सर्जिकल स्ट्राईक झाला आहे. पण त्याची आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही. कारण ते एक बूमरँग असते. अनेकदा याचे वाईट अनुभव आले आहेत. याकुबला फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थिव मुंबईला आणले. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी ७० हजार लोक उपस्थित होते, हे चांगले लक्षण नाही. या गोष्टीमुळे दोन समाजामध्ये विनाकारण द्वेष निर्माण होतो. हेच सर्जिकल स्ट्राईकने केले. त्याचा मोठा प्रचार झाल्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायल्या मिळाल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रचार केला जात आहे. (प्रतिनिधी)