सुरेश प्रभूंवर शिवसेना नाराज!

By Admin | Updated: February 27, 2015 02:35 IST2015-02-27T02:35:42+5:302015-02-27T02:35:42+5:30

भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पातही मुंबईसह महाराष्ट्रावर अन्याय झाला असल्याची टीका करीत

Suresh Prabhu, Shivsena angry! | सुरेश प्रभूंवर शिवसेना नाराज!

सुरेश प्रभूंवर शिवसेना नाराज!

मुंबई : भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पातही मुंबईसह महाराष्ट्रावर अन्याय झाला असल्याची टीका करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेनेच्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला, पण केंद्र व राज्यातील सत्तेत राहून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर तोंडसूख घेण्याच्या शिवसेनेच्या राजकारणामुळे सध्या भाजपा त्रस्त झाला आहे.
मुंबई व महाराष्ट्रात नवे रेल्वेमार्ग सुरु केले जावे, उपनगरी प्रवाशांना दिलासा देण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना दिले होते. पण अर्थसंकल्पात प्रभूंनी महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना गजानन कीर्तिकर, शिवाजीराव अढळराव पाटील, भावना गवळी, प्रतापराव जाधव या शिवसेना खासदारांनी व्यक्त केली. सुरेश प्रभू यांना शिवसेनेच्या कोट्यातून केंद्रात मंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपाने दिला होता. मात्र प्रभू यांचा गेल्या काही वर्षांत शिवसेनेबरोबर संबंध नसल्याने त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री करण्यास शिवसेनेने विरोध केला. अखेरीस प्रभू यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना मंत्री करण्यात आले. यामुळे अगोदरच शिवसेना व प्रभू यांचे संबंध बिघडले असताना आता प्रभू यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेने तोंडसूख घेतले आहे.

Web Title: Suresh Prabhu, Shivsena angry!