शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

दिल्लीत अजित पवार वेटिंगवर? सुनील तटकरे म्हणाले, "आम्हाला माहिती होतं की अमित शाह..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:37 IST

अजित पवार हे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी पोहोचल्याची चर्चा होती

Maharashtra Politics: महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नांची उत्तरे ५ डिसेंबरला मिळणार आहेत. मात्र प्रचंड बहुमत मिळूनही सरकार स्थापनेसाठी इतका वेळ का लागत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्रिपदांच्या विभाजनावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी पोहोचल्याची चर्चा होती. मात्र आता सुनील तटकरे यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे.

सोमवारी रात्री अजित पवार हे दिल्लीत पोहोचले होते. अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अमित शाह चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झालेली नाही. त्यामुळे अजित पवार हे दिल्लीत वेटिंग असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या वृत्ताचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खंडन करत अजित पवार अमित शाह यांच्या भेटीसाठी आले नसल्याचे म्हटलं आहे.

"येणाऱ्या काळात पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी मी, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी प्रदीर्घ चर्चा केली. अमित शाह यांची भेट झाली तर मंत्रिमंडळासंदर्भात आम्हाला चर्चा करता येईल. अजित पवारांनी अमित शाहांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती. त्यामुळे त्यामध्ये काही गैरसंवाद झालेला नाही. अजित पवार अमित शाह यांच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करुन आलेलच नाहीत. त्यावेळी अजित पवार दिल्लीत वेटिंगवर आहेत हे वृत्त खोटं आहे. या वृत्ताचे मी खंडन करतो. आम्हालाही माहिती होतं की अमित शाह आज चंदीगढ येथे जाणार आहेत," असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

आमदार कमी असले तरी सत्तेत वाटा समसमान असावा अशी तुमची भूमिका असणार आहे का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला."मंत्रीपदं वाटपाच्या चर्चेसाठी आम्ही बसू त्यावेळी किती खाती घ्यायची याची चर्चा करु. लोकसभेला आम्ही फार जागा मिळवू शकलो नाही. उलट धाराशिवची जागा आम्हाला नको असताना लढवावी लागली. परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती. परंतु महादेव जानकरांना महायुतीमध्ये घेतलं जावं असा निर्णय अमित शाह यांच्या समोर झाला होता. त्यावेळी ती जागा आम्हाला सोडावी लागली. विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह होता. जास्त जागा मिळाल्या असत्या तर अधिक आमदार निवडून आले असते. मात्र तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याने प्रचाराची रणनिती आम्हाला चांगल्या पद्धतीने राबवता आली आणि भव्यदिव्य यश मिळालं," असंही सुनील तटकरे म्हणाले.

"महायुतीमध्ये मान सर्वांनाच आहे. मान मिळाला नसल्याचे वक्तव्य कोणी केल ते मला माहिती नाही. ज्यावेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो त्यावेळी वरिष्ठांची भेट झाली तेव्हा सर्वांना सन्मानपूर्वकच वागवलं जात आहे," असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहsunil tatkareसुनील तटकरे