सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले, तेवढे राजकीय भान आम्हाला आहे... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:18 IST2026-02-05T15:15:49+5:302026-02-05T15:18:22+5:30

Sunetra Pawar Deputy CM: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून होणाऱ्या वादावर सुनील तटकरेंनी सोडलं मौन. दमानियांच्या आक्षेपांना दिलं सडेतोड उत्तर.

Sunetra Pawar Deputy CM: Sunetra Pawar's Deputy Chief Minister post in danger? Sunil Tatkare said, we have that much political awareness... | सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले, तेवढे राजकीय भान आम्हाला आहे... 

सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले, तेवढे राजकीय भान आम्हाला आहे... 

मुंबई: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे.

अंजली दमानिया यांनी असा आक्षेप घेतला होता की, सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत. खासदारकीचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याशिवाय त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही. तसेच, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

तटकरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "आम्हाला तांत्रिक बाबींचे पूर्ण भान आहे. १९९१ मध्ये शरद पवार आणि स्वतः अजित पवार यांची उदाहरणे आहेत. सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती सहा महिने पदावर राहू शकते, सुनेत्रा पवारांचे पद कोणत्याही धोक्यात नाही," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनानंतर (जानेवारी २०२६) अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याने टीका झाली होती. यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की, शपथविधी तातडीने झाला नसून, ७२ तासांनंतर आणि सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनच पार पडला आहे. अंत्यसंस्काराआधीच मुलाखती देऊन विलीनीकरणाची हवा निर्माण करण्यामागे नेमका काय उद्देश होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तटकरे यांनी एबीपी माझाला ही मुलाखत दिली. 

Web Title : सुनेत्रा पवार का उपमुख्यमंत्री पद सुरक्षित, सुनील तटकरे का कहना है

Web Summary : सुनील तटकरे ने सुनेत्रा पवार की उपमुख्यमंत्री नियुक्ति को राज्यसभा सदस्यता के कारण अवैध बताने वाले दावों को खारिज किया। उन्होंने पूर्व उदाहरणों का हवाला देते हुए कहा कि उनका पद सुरक्षित है, और शपथ उचित प्रक्रिया के बाद ली गई।

Web Title : Sunetra Pawar's Deputy CM Post Safe, Says Sunil Tatkare

Web Summary : Sunil Tatkare dismissed claims that Sunetra Pawar's Deputy CM appointment is illegal due to her Rajya Sabha membership. He cited precedents, affirming her position is secure, clarifying the oath was taken after due process.