शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 8:21 PM

गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला.

ठळक मुद्देपुण्यात शतकातील सर्वोच्च तापमानाची नोंद महाराष्ट्रासह मध्यभारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ

पुणे :  हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात आणि मध्यमहाराष्ट्रावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्यभारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने राज्यात उष्म्याची लाट आली आहे. पुणे शहरात गेल्या शतकातील सर्वोच्च ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान असून, अजून ही स्थिती दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचितशी घट होईल, मात्र राज्याचा पारा चाळीच्या आसपासच राहील असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार ते पाच अंशाची वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानाचा पारा देखील वीस अंशापुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवसाबरोबर रात्र देखील उष्म्याचीच असेल. राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील किमान तापामानाचा पारा देखील २९.७ अंश सेल्सिअसवर आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमान ४५च्यावर गेले असून, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशा दरम्यान आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर असल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. ----------------

मध्य महाराष्ट्र आणि गुजरातेत जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आर्द्रता वाढून मध्य भारतातील उष्मा वाढला आहे. पुढील अठ्ठेचाळीस तास हीच स्थिती राहील. तसेच, राज्याच्या किमान तापमानाचा पारा सरासरी २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर कमाल तापमानात किंचीत घट होईल. मात्र, राज्याचा सरासरी पारा हा चाळीस अंश सेल्सिअस दरम्यानच राहील. अरविंद श्रीवास्तव, वरिष्ठ शास्त्रज्ञ हवामान विभाग ---------------------------राज्यातील कमाल तापमानाचा पारा

पुणे ४२.६, लोहगाव ४२.५, अहमदनगर, ४४.९, जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक ४१.७, सांगली ४३, सातारा ४१.६, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४३, परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, बुलडाणा ४३.१, ब्रम्हपुरी ४५.८, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.२, वाशिम ४४.२, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५ 

 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशल