शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये बाळंत महिलेची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आत्महत्या

By admin | Updated: June 16, 2016 16:42 IST

शौचास जात असल्याचे सांगून एका बाळंत महिलेने स्वच्छतागृहातील खिचकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. १६ -  शौचास जात असल्याचे सांगून एका बाळंत महिलेने स्वच्छतागृहातील खिचकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घढली.  शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही़महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या बाळंत महिलेचे नाव आहे़ महादेवी दमदाडे यांचे सासर अंबाजोगाई असून माहेर रेणापूर आहे़ त्यांना पहिला मुलगा असून दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने बाळंतपणासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या़ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आले असता त्यांना दुसराही मुलगा झाला़ त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ठेवण्यात आले़दररोजच्याप्रमाणे महादेवी यांचे वडिल शरणप्पा कलशेट्टी हे बुधवारी दुपारी गावाकडून जेवणाचा डबा आणले होते़. दुपारी दीडच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सोबत असलेल्या नातेवाईकांना शौचास जात असल्याचे सांगितले़. बराच वेळानंतरही त्या परतल्या नसल्याचे पाहून नातेवाईकांनी स्वच्छतागृहाकडे जाऊन हाक मारली़ मात्र, आतून कुठलाही आवाज येत नसल्याचे तसेच दारही उघडत नसल्याचे पाहून तेथील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले़ त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महादेवी यांनी खिडकीच्या गजास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले़. मयत महादेवी दमदाडे यांचे पती एका खासगी बसवर चालक म्हणून काम करतात.