कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: October 13, 2015 22:39 IST2015-10-13T22:39:18+5:302015-10-13T22:39:18+5:30

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वाशिम तालुक्यातील शेतक-याने प्राशले विष.

Suicide of Debt Farmer | कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

वाशिम : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वाशिम तालुक्यातील पिंपळगाव (डा.बं.) येथील चंद्रभान लक्ष्मण निरगुडे या ४0 वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. पिंपळगाव येथील चंद्रभान निरगुडे यांच्याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी बँकेकडून ३0 हजाराचे कर्ज काढले होते. तसेच खासगी सावकारांकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज कसे फेडायचे आणि मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली वावरत होते. नैराश्य आल्याने शेवटी त्यांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. विष प्राशन केल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी निरगुडे यांना उपचारासाठी तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी निरगुडे यांना मृत घोषित केले.

Web Title: Suicide of Debt Farmer