Sudhir Mungantiwar criticized Sharad Pawar from Ram temple issue | तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर

तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर

मुंबई : राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. तर शरद पवारांनी आपल्या पक्षाचा ट्रस्ट करून मशीद बांधावी, असा खोचक टोला भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बुधवारी दिल्लीत पहिली बैठक पार पडली. त्याचवेळी उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारकडे मशिदी बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली. जर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला होता.

यावरून मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला असून, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?, तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा असे मुनगंटीवार म्हणाले. तर आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली, असल्याचा आरोपही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

 

 

Web Title: Sudhir Mungantiwar criticized Sharad Pawar from Ram temple issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.