पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल करावे. आरोपींविरोधात पुरावा नसेल तर तसा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, अशी मागणी आरोपींच्या वकीलांनी न्यायालयाकडे केली आहे. त्याची दखल घेत यावर तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांना म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. डॉ. दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ ला पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी इचलकरंजी येथून नागोरी आणि खंडेलवाल यांना २० जानेवारीला अटक केली होती. त्यांनी विकलेल्या पिस्तुलातूनच डॉ. दाभोलकरांचा खून झाल्याचा बॅलेस्टिक अहवालाचा दाखला पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आला होता. त्यानंतर बॅलेस्टिक अहवालाशिवाय अन्य पुरावा पोलिसांना सादर करता आला नाही. आरोपींना अटक करून ३ महिले उलटून गेले तरी त्यांविरोधात आरोपपत्र सादर केले नसल्यामुळे न्यायालयाने नागोरी आणि खंडेलवाल यांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला. अद्यापही या प्रकरणी पोलीस आरोपपत्र दाखल करू शकलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी आरोपीचे वकील बी. ए. आलूर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांच्या न्यायालयात अर्ज करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा नाहीतर आरोपींविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा अर्ज तरी सादर करावा, या मागणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांना म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यावर उद्या (मंगळवारी) यावर सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
नागोरीविरुद्ध पुरावे अहवाल सादर करा
By admin | Updated: May 27, 2014 05:48 IST
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल करावे
नागोरीविरुद्ध पुरावे अहवाल सादर करा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}