शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत ‘एम्स’?

By admin | Updated: July 11, 2014 01:28 IST

एम्सच्या (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) धर्तीवर मेडिकल, मेयोचा विकास अशी ओरड लोकप्रतिनिधींकडून व्हायची. आता अर्थसंकल्पातच विदर्भात एम्सची घोषणा

विकास होणार : वैद्यकीय क्षेत्रात उत्साहनागपूर : एम्सच्या (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) धर्तीवर मेडिकल, मेयोचा विकास अशी ओरड लोकप्रतिनिधींकडून व्हायची. आता अर्थसंकल्पातच विदर्भात एम्सची घोषणा झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. ‘एम्स’मुळे विदर्भातील आरोग्य क्षेत्रात बदल घडण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतात वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रणी संस्था निर्माण करण्याचे स्वप्न भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व तत्कालीन आरोग्यमंत्री राजकुमार अमृताकौर यांनी पाहिले आणि यातूनच पार्लमेंट्री अ‍ॅक्ट १९५६ नुसार व न्यूझिलण्ड सरकारच्या कोलंबो प्लानमधील सहकार्याने ‘एम्स’ ही संस्था निर्माण झाली. सद्यस्थितीत डॉक्टर-रुग्णाचे प्रमाण पाहिल्यास २००० हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आहे. हे प्रमाण हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आणण्यासाठी डॉक्टरांची निर्मिती वाढविण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला. त्यानुसार देशातील सहा राज्यात एम्ससारखीच सहा वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्याचा निर्णय २०१२ मध्ये घेण्यात आला. भोपाळ (मध्यप्रदेश), भुवनेश्वर (ओरिसा), जोधपूर (राजस्थान), पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगढ), ऋषिकेश (उत्तराखंड) येथे एम्सला मंजुरी मिळाली. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रयत्न अपुरे पडले. असा आहे ‘एम्स’साठी पर्याय दिल्लीचा एम्सचा पसारा हा ३३० एकर जागेवर आहे. शहरात सद्यस्थितीत एवढी जमीन नाही. परंतु शहराच्या सीमेलगतच्या भागात एम्ससाठी जागा मिळणे शक्य आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार वर्धा रोडवरील मिहान प्रकल्पाजवळ, अमरावती रोड किंवा भंडारा रोड या मार्गावर एम्स होण्याची शक्यता आहे. जिथे रेल्वे, महामार्ग आणि हवाई सेवा उपलब्ध आहेत, तिथे एम्स उभारण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.असे आहे ‘एम्स’दिल्लीच्या एम्सचा दरवर्षीचा खर्च ११ अब्ज रुपये आहे. येथे ५५० वैद्यकीय शिक्षक कार्यरत असतात. ७७ पदवीपूर्व व २२० पदव्युत्तर विद्यर्थ्यांना शिकविले जाते. येथे ४५ सुपरस्पेशालिटीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. एम्सचा उद्देशदेशातील इतर वैद्यकीय शिक्षण संस्थांना मार्गदर्शक ठरू शकेल अशी वैद्यकीय शिक्षण पद्धती निर्माण करणे.अत्युत्तम प्रकारच्या वैद्यकीय शिक्षण सुविधा एकत्र आणून आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देणे.पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये स्वयंपूर्णता आणणे.एम्सची कर्तव्ये.वैद्यकशास्त्रातील विविध क्षेत्रात पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण देणे.परिचारिका व दंतवैद्यक शास्त्रामध्ये शिक्षण देणे.वैद्यकीय शिक्षणामध्ये नवनवीन विचारप्रवाह आणणे.देशासाठी वैद्यकीय शिक्षक निर्माण करणे.वैद्यक व संबंधित विषयांमध्ये संशोधन करणे.आरोग्य सेवा देणे.सुपरलाही हवी स्वायत्तता उपराजधानीत ‘एम्स’ होईल तेव्हा होईल परंतु त्यापूर्वी सुपर स्पेशालिटीला स्वायत्तता देऊन त्याचा विकास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. १९८४ मध्ये सुपर स्पेशालिटीला सुरुवात झाली. त्यावेळी तत्कालीन आरोग्य सचिव गिल यांनी या स्पेशालिटीला स्वतंत्र दर्जा देण्यात येईल व मेडिकलमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही, असे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले, परंतु अद्यापही सुपरला स्वायत्तता मिळाली नाही. ही संस्था अजूनही मेडिकलच्या अधिपत्याखालीच असल्याने सुपरचा विकास रखडला आहे. या इस्पितळात गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरो सर्जरी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, कॉर्डिओथोरेसीस आणि आता १८ वर्षांनंतर युरोलॉजी हा नवा विभाग सुरू करण्यात आला. सध्या या रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या वेळातच तपासणी व रुग्णांना भरती करून घेण्यात येते. या इस्पितळात आकस्मिक विभाग नाही. गंभीर आजाराच्या रुग्णांना भरतीही करून घेतले जात नाही.