शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिवाळी भेट !

By admin | Updated: October 14, 2016 03:56 IST

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली.

मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असलेल्या समाजाच्या सर्व घटकांतील पालकांच्या पाल्यांची उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठीची शुल्क प्रतिपूर्ती आता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही मूठभर लोक प्रयत्न करीत आहेत.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध शैक्षणिक सवलतींचे निर्णय घेण्यात आले. ईबीसीची मर्यादा वार्षिक एक लाख रुपये उत्पन्नावरून २.५० लाख इतकी करण्यात आली. या योजनेमुळे मराठा समाजाबरोबरच इतरही विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेताना आर्थिक भार पडणार नाही. एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांनाच आतापर्यंत ही सवलत होती. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती मिळेल. या योजनेचा लाभ शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना यावर्षीपासूनच मिळेल. अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये (मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद) निवास व्यवस्थेसाठी वर्षाकाठी ३० हजार रुपये (दरमहा तीन हजार) तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रु पये (दरमहा २ हजार रु.) यासाठी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख योजना राबविण्यात येईल. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. वसतिगृहांमधील प्रवेशापासून वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहणे, जेवण आदीसाठी सहा हजार रुपये, मध्यम शहरात पाच हजार व लहान शहरात तीन हजार रुपये महिन्याकाठी देणारी पं.दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येईल. पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. येत्या मार्चपर्यंत तिन्ही योजनांसाठी १ हजार कोटींची तरतूद केली आहे.

समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी चुकीचे संदेश सोशल मीडियामध्ये पाठविले जात आहेत. एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुध्द भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले वर्तन सर्व समाज घटकांकडून झाले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(विशेष प्रतिनिधी)