शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतला म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 4:35 PM

अधिकच्या शिकवणीमुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने वैतागलेल्या काही मुलांनी शाळेतील शिक्षकांसोबत धक्कादायक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे. 

सिंधुदुर्ग  - आपल्या शाळेतील विद्यार्थ्यी चांगले शिकावेत. त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळावेत, यासाठी अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी प्रसंगी अनेक शाळांमधून सुट्टीच्या दिवशीही अधिकच्या शिकवण्या घेतल्या जातात. मात्र अशा अधिकच्या शिकवणीमुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने वैतागलेल्या काही मुलांनी शाळेतील शिक्षकांसोबत धक्कादायक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरालगत असलेल्या एका गावातील शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. दहावीची परीक्षा जवळ आल्याने उजळीसाठी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त वर्ग रविवारी भरवण्यात आला होता. मात्र या अतिरिक्त वर्गामुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने काही मुले नाराज होती. त्यापैकी पाच मुलांनी शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी वर्गातील शिक्षकांच्या बसण्याच्या जागेवर तसेच टेबलावर खाजकुलीची पुड टाकून ठेवली. त्यामुळे वर्गात शिकवण्यास आलेल्या दोन शिक्षिकांना ही पुड लागून त्यांना त्रास झाला. ग्रामीण भागात सर्रासपणे आढळणाऱ्या खाजकुलीच्या वेलीला येणारी फळे आणि त्या फळांची पुड शरीरास लागल्यास तीव्र खाज येऊन, जळजळ होते. ही बाब माहिती असलेल्या या मुलांनी या खाजकुलीच्या पुडीचा प्रयोग आपल्या शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी केला.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बोलावून घेत त्यांची कानउघाडणी केली. मात्र मुलांचे दहावीचे महत्त्वाचे वर्ष आणि परीक्षा समोर असल्याने या मुलांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आले.  

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीTeacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्ग