शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

By admin | Updated: August 17, 2016 21:21 IST

पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 17 - अपघात प्रकरणातील चालकावर गुन्हा दाखल करण्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाईकांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. खाडगाव (ता. लातूर) येथील मरिबा राघू मगर (५४) हे सायकलवरुन लातूरच्या दिशेने १४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास येत असताना, भरधाव टेम्पो (एम.एच. २४ बी ६१०२) च्या चालकाने त्यांना धडक दिली. यात मरिबा मगर हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नसल्याने, संतप्त नातेवाईकांनी चालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी अर्जही दिला होता. मात्र गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करुन घेण्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली.पोलिस ठाण्यात घोषणाबाजी...मृत मरिबा राघू मगर यांच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घोषणाबाजी आणि हालगीनाद करत घटनेचा निषेध नोंदविला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी अपघातातील टेम्पो आणि चालकाला १५ मिनिटात अटक केली. याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.