शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत टोकाचा तणाव

By admin | Updated: September 15, 2014 04:38 IST

राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली

मुंबई : राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाढवून मिळत नसल्याने भाजपाचे नेते नाराज असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट टीका केल्याने भाजपा नेत्यांचा अक्षरश: तीळपापड झाला आहे.शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता शुक्रवारी भाजपाच्या नेत्यांनी मातोश्री गाठले होते. मात्र एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेनेने बैठकीत घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा हे सूत्र वर्षानुवर्षे ठरलेले असून त्यामध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केल्याने भाजपाचे नेते निराश होऊन परतले. शनिवारी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करताना लोकसभा निवडणुकीत विजय केवळ एकट्या नरेंद्र मोदी यांचा नाही तर शिवसेनेचाही त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे मत व्यक्त केले. यामुळे भाजपा नेत्यांचा तीळपापड झाला. शनिवारी रात्री भाजपा नेत्यांची बैठक झाली व त्यामध्ये या टीकेचा समाचार घेण्याचे ठरले. राज्यात भाजपा नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास इतकी अनुकूल संधी पुन्हा येणार नाही, असे भाजपाला वाटते. शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली आणि १३५ किंवा त्यापेक्षा अधिक जागा दिल्या तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा पाया खिळखिळा केल्यासारखे होईल, अशी भीती शिवसेनेला वाटते. (विशेष प्रतिनिधी)