शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

तणाव टाळण्यासाठी नाशिकमध्ये मोबाइल डेटा आणि इंटरनेट सेवा बंद

By admin | Updated: October 10, 2016 13:48 IST

तळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले.

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 10- त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. रविवारी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर वातावरण चिघूळ नये, अफवा पसरु नयेत यासाठी मोबाईल डेटा आणि इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी खंडीत करण्यात आली आहे. 
 
सोशल मीडियावरुन अफवा, प्रक्षोभक मजकूर पसरु नये हा यामागचा उद्देश आहे. तळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर येताच संपूर्ण नाशिकमध्ये आंदोलने सुरु झाली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत एस.टी. बसेस व इतर वाहने पेटवून दिली. 
 
दगडफेकीत ३५ पोलीस जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरूच होते. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी नाशिकमध्ये येऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व 15 दिवसात आरोपपत्र दाखल करुन जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले.