शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील वाहनांचे पासिंग बंद

By admin | Updated: August 24, 2016 20:24 IST

ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात 250 मीटर लांबीचा ब्रेक चाचणी ट्रॅक नाही अशा राज्यभरातील सर्व सर्व कार्यालयातील वाहनांचे पासिंग

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24  : ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात 250 मीटर लांबीचा ब्रेक चाचणी ट्रॅक नाही अशा राज्यभरातील सर्व सर्व कार्यालयातील वाहनांचे पासिंग ( योग्यता प्रमाणपत्र तपासणी ) बुधवारी सकाळी पासून बंद करण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश कार्यालयांमध्ये सकाळी अचानक ही सुविधा बंद करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात पुणे, ठाणे ,पिंपरी-चिंचवड सह इतर ठिकाणी पासिंगसाठी आलेली हजारो वाहने माघारी घेऊन जाण्याची वेळ वाहनधारकांवर आली. दरम्यान, ही तपासणी येत्या 29 आॅगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश असून त्यामुळे राज्यातील लाखो वाहने पासिंग अभावी एकाच जागी उभी राहणार आहेत. त्यात प्रवासी वाहनांसह अनेक मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.

वाहनांची योग्यप्रकारे चाचणी न करता फिटनेस तसेच ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट आरटीओकडून दिली जाते. त्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाला वाहनांची योग्यप्रकारे चाचणी घेऊनच फिटनेस व ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट देण्याचा आदेश द्यावा, यासाठी पुण्याच्या श्रीकांत कर्वे यांनी अँड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सध्या सुरू आहे.

या सुनावणी दरम्यान, सहा महिन्याच्या आत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये हे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने एका महिन्याच्या आत हमीपत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार,राज्यात ज्या ठिकाणी असे टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाहित त्या ठिकाणचे सर्व योग्यता प्रमाणपत्रांचे पासिंग तातडीने थांबविण्याचे आदेश मंगळवारी सकाळी परिवहन उपायुक्त अ.न भालचंद्र यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. मात्र, राज्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये हा टेस्ट ट्रॅकच नसल्याने सर्व ठिकाणचे पासिंग बंद राहणार आहे. पुणे -पिंपरींत गोंधळपरिवहन आयुक्तांकडून आज सकाळी हे आदेश तातडीने काढण्यात आले. त्यामुळे सकाळी पासिंग सुरू होताच ते बंद करण्यात आले. मात्र, पासिंग बंद करण़्यात येणार असल्याची कोणतीही कल्पना नसल्याने पासिंगसाठी आलेल्या वाहनधारकांची चांगलीच तारंबळ उडाली. अचानक पासिंग होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने या वाहनधारकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर वरिष्ट अधिका-यांनी या आदेशाची माहिती देत 29 आॅगस्ट पर्यंत कोणतेही पासिंग होणार नसल्याचे स्पष्ट केले.