शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ३५% लोक मतदानापासून दूर

By admin | Updated: September 15, 2015 01:30 IST

मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील

- संकेत सातोपे,  मुंबई मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. आज जागतिक लोकशाही दिनानिमित्त आढावा घेतला असता, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या १६ निवडणुकांमध्ये कधीही ७० टक्के मतदारांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते.गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ६६.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या आधीच्या २००९ सालच्या निवडणुकीत केवळ ५८.१९ टक्के लोकांनी मतदान केले होते. स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या दोन निवडणुकांमध्येच झाल्याचे दिसते. १९५१च्या सार्वत्रिक निवडणुकीत ४४.८७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे १८५७ सालच्या निवडणुकीमध्ये ४५.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान राहिली आहे.जागतिक लोकशाही दिन विशेष : २०१४ला सर्वाधिक ६६ टक्के मतदानएकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55-58% - मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच अद्याप जवळपास निम्मा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहे. त्यातही नोंदणी झालेली नसलेल्या पात्र नागरिकांची गणना केलेली नाही अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. आता इतक्या मोठ्या वर्गाला मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे आव्हान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.