State's scholarship test results are reduced | राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला
राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला

ठळक मुद्दे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत इयत्ता पाचवीच्या निकालात सुमारे एक ते दोन टक्क्यांनी घट झाली आहे. पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल २२.०४ टक्के, तर आठवी शिष्यवृत्तीचा निकाल १८.४९ टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या ८ लाख ६६ हजार १३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७२ हजार ४६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३९४ आहे, असे परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. परिषदेतर्फे १६ मे रोजी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. तसेच १६ ते २५ मे या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांवर आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बुधवारी (दि. १९)शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.
पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा आपल्या शाळेचा सर्वाधिक निकाल लागावा यासाठी जिल्हा परिषदेच्या  शिक्षकांमध्ये स्पर्धा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यातच प्राथमिक शिक्षणाची रचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा 
परिषदेच्या शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर झाला आहे. 
............
विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
च्शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थी तेच आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी दुसरे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यावर भर द्यावा. तरच शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात वाढ होईल, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाºयांनी सांगितले.
.................
परीक्षेचे नाव         नोंदवलेले        पात्र             शिष्यवृत्तीधारक     निकालाची 
                            विद्यार्थी        विद्यार्थी       विद्यार्थी               टक्केवारी
इयत्ता पाचवी      ५,१२,७६३       १,०९,२३०       १६,५७९                २२.०४
इयत्ता आठवी     ३,५३,३६८       ६३,२३६         १४,८१५                  १८.४९
एकूण                    ८,६६,१३१    १,७२,४६६        ३१,३९४                २०.५९    


Web Title: State's scholarship test results are reduced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.