शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे पोलीस दल लोकाभिमुख करणार

By admin | Updated: October 1, 2015 03:10 IST

गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल

मुंबई : गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल, असे प्रतिपादन राज्याचे नूतन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी बुधवारी केले. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी राज्यभर ‘पोलीस मित्र’सारखी संकल्पना राबवून पोलिस दल लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेही दीक्षित यांनी म्हटले आहे. मावळते पोलीसप्रमुख संंजीव दयाल यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,‘महाराष्ट्र पोलीस हे देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्याचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारताना मला जबाबदारीची जाणीव आहे. संजीव दयाल यांनी गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले, आपलाही त्यावर भर राहणार असून त्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक उपायांचा वापर अधिकाधिक केला जाईल. तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अवगत करता आले पाहिजे. असे सांगून दीक्षित म्हणाले,‘नागरिकांनी आपला ऐवज,मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरुक राहून पोलिसांना सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. त्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना खूप उपयुक्त ठरत आहे. नागपूरला आयुक्त म्हणून कार्यरत असताना ती यशस्वी ठरली होती,आता राज्यभर त्याची व्याप्ती वाढविली जाईल, त्यातून रस्त्यावरील गुन्ह्यांच्या अटकावाबरोबरच दहशतवादी कारवायांवरही प्रतिबंध घालणे शक्य आहे. त्याचप्रमाणे महिला, मुले, जेष्ठ नागरिक व अल्पसंख्याक समाजाच्या हक्क व संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल. राज्यातील औद्योगिकरण वाढविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांंना पूरक वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल. सव्वा दोन लाखांवर पोलिसांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)----------‘सनातन’बाबत अधिक माहिती घेऊन कारवाईसनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता दीक्षित म्हणाले,‘यापूर्वीच्या प्रस्तावाला चार वर्षांचा अवधी झाला आहे. त्यानंतर संस्थेची कार्यपद्धती कशी राहिली आहे, याची माहिती घेवून त्यांच्यावर बंदीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून आता त्याबाबत अधिक बोलणे उचित नाही.डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून सुरु असून त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य पोलिसांकडून पुरविले जाईल.