शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

राज्य पुन्हा तापले : चंद्रपूर ४७.८ अंशावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:45 PM

देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे.

ठळक मुद्देकमाल तापमानात ३ ते ५ अंशाची वाढअंदमानामध्ये २० मेच्या सुमारास मॉन्सूनने हजेरी लावलीमध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे

पुणे : देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे. उलट कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ नोंदविण्यात आली असून, पुढील ३ दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्यावर्षी राज्यासह देशातील अनेकभागात सरासरीपेक्षा पावसाची टक्केवारी कमी राहिली आहे. तीव्र उष्णतेमुळे धरणांनी देखील तळ गाठला आहे. अंदमानामधे २० मेच्या सुमारास मॉन्सूनने हजेरी लावली. मात्र, अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल रेंगाळली आहे. साधारण १५ मे नंतर कमाल तापमानात घट होत असते. मात्र, तापमानात घट होण्याऐवजी सूर्य पुन्हा आग ओकू लागल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे. मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. याच बरोबर राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये देखील चार अंशापर्यंत वाढ झाल्याने, रात्रीच्या उकाड्यात देखील वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील. राज्यातील कमाल तापमान : मध्य महाराष्ट्र -  पुणे ३९.७, लोहगाव ४०.९, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३८, महाबळेवर ३४.२, मालेगाव ४२.४, नाशिक ३८.५, सांगली ३९.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.८, मराठवाडा - उस्मानाबाद ४३.४, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, नांदेड ४४.५, बीड ४४.२, विदर्भ- अकोला ४५.६, अमरावती ४५.८, बुलडाणा ४१.७, ब्रम्हपुरी ४६.९, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४५.५, नागपूर ४७.५, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५, कोकण- सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.६.

..................राज्यावर जास्त दाबाचा पट्टा असल्याने जमिनी लगतची गरम हवा वर जात नाही. त्यामुळे विदर्भासह राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील. - अरविंद श्रीवास्तव, प्रमुख, जलवायू संशोधन-हवामान विभाग

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात