राज्यात ‘आप’मध्ये फूट ?

By Admin | Updated: March 30, 2015 02:07 IST2015-03-30T02:07:18+5:302015-03-30T02:07:18+5:30

आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याने पुण्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

State split into AAP? | राज्यात ‘आप’मध्ये फूट ?

राज्यात ‘आप’मध्ये फूट ?

पुणे : आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याने पुण्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
पक्षाला वैचारिक बैठक देणारे व जनचळवळीच्या कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असलेले योगेंद्र यादव यांना पक्षात स्थान नसल्याने
दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाहेर पडायचे की पक्षात राहायचे, या मन:स्थितीमध्ये पदाधिकारी आहेत.
महाराष्ट्रातील विविध जनआंदोलनाच्या चळवळींना आपमध्ये घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे यादव यांचीच राष्ट्रीय कार्यकारिणीतून शनिवारी हकालपट्टी झाली. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी राजीनामा दिला.
विविध आघाड्यांचे समन्वयक मानव कांबळे म्हणाले, की योगेंद्र यादव यांनाच पक्षात स्थान नसल्याने येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपमध्ये राहायचे की नाही, याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.

Web Title: State split into AAP?