शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य टोलमुक्त करण्याचा शब्द पाळणार

By admin | Updated: November 3, 2014 03:33 IST

संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत.

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत. ‘रस्ते की खड्डे’ अशा प्रश्नात नागरिकांना पाडण्याऐवजी राज्यात चांगले रस्ते करण्यावर माझा भर राहणार आहे, असे सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. भाजपा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते रविवारी कोल्हापुरात आले होते. पाटील म्हणाले, दुरुस्तीचा खर्च कमी राहील असे रस्ते केले जातील. आधीच्या मंत्र्यांमुळे सार्वजनिक बांधकाम खातेच नव्हे, तर सर्वच खाती भ्रष्टाचारामुळे बदनाम झाली आहेत. त्यामुळे या खात्यांतील भ्रष्टाचार संपवून सामान्य माणसाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी, खा. राजू शेट्टी यांना ऊस दरासाठी २५ तारखेची वाट पाहावी लागणार नाही. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ३१ डिसेंबरपूर्वी घेणार आहोत. सहकार कायद्यात आवश्यक सुधारणा डिसेंबर अथवा मार्चच्या अधिवेशनात करणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)