शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटरवरून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 4:06 PM

मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी आज दिलीप वळसे पाटील हजर होते.

पुणे (मंचर) :राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वळसे पाटील यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.उद्या वळसे-पाटील यांचा 64 वा वाढदिवस असून कार्यकर्ते  काहीसे चिंतेत पडले आहे. 

राज्याचे कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. वळसे पाटील आज मंत्रालयात कामासाठी हजर होते. मात्र बैठक सुरू होण्याआधी त्यांना त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे कळले. बैठक सुरू होण्याआधीच ते घरी परतले आहेत.

 ट्विटमध्ये म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. मला कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान त्यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेसाठी रुजू होईल.असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे

दरम्यान वळसे पाटील यांचा उद्या 64 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा होणार नव्हता. कार्यकर्ते केवळ शुभेच्छा देणार होते. मात्र सकाळी वळसे-पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत. एकमेकांना दूरध्वनी करून वळसे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस ते करत होते .वळसे-पाटील लवकर बरे व्हावेत यासाठी समाज माध्यमातून सदिच्छा दिल्या जात आहेत.

एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला होते हजर...  

भाजपा सोडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांपासून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात दिलीप वळसे पाटीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

......

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ट्विटवरून दिल्या सदिच्छा...दिलीपराव ,आपण लवकरात लवकर बरे होऊन समाजकारणात सक्रिय व्हाल ह्याची खात्री आहे.आपणास उत्तम निरोगी आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो.अशा शब्दात माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा दिल्या आहेत.

 

टॅग्स :Puneपुणेministerमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसeknath khadseएकनाथ खडसे