शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा

By admin | Updated: October 1, 2015 02:57 IST

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) द्वारा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रतिव्यक्ती ५८.३४ रुपये दिले जातात.

अकोला : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) द्वारा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रतिव्यक्ती ५८.३४ रुपये दिले जातात. मात्र राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिव्यक्ती ४० रुपयांप्रमाणे अनुदान दिले जात असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातून उघड झाला आहे.विविध सामाजिक संघटना, संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशातून रक्तदात्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व चहा-बिस्कीट देण्यासाठी केंद्र पुरस्कृत नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनद्वारा राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रति रक्तदाता ५८.३४ रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते. राज्य रक्त संक्रमण परिषदेला या अनुदानात कपात करण्याचे अधिकार नसताना राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिरक्तदाता ४० रुपये अदा केले जातात. ‘नॅको’च्या ११ मार्च २०१४ च्या परिपत्रकानुसार ७५ रक्तदात्यांच्या एका शिबिरासाठी ४ हजार ३७५ रुपये राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे सोपवले जातात. यामध्ये इंधनासाठी एक हजार रुपये, ‘आयईसी’ साहित्यासाठी ३७५ रुपये, प्रमाणपत्र, पिन, स्मृतिचिन्हांसाठी १ हजार १२५ रुपये व प्रत्येक रक्तदात्याच्या नाश्त्यासाठीही निधीची तरतूद केली आहे. मुळात ऐच्छिक रक्तदात्यांना लहान बिस्कीटचा पुडा व एक कप चहा किंवा कॉफी दिली जाते. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता, वर्ष २०१४ मध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील २९९ रक्तपेढ्यांना प्रतिरक्तदाता ४० रुपये दिले. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास २५ रुपयांचा नाश्ता दिल्यानंतर उर्वरित १५ रुपये शिबिरासाठी इतर कामामध्ये खर्च झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.