शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेश भाजपाचा कारभार तुटलेल्या कार्यालयातूनच

By admin | Updated: January 15, 2017 03:23 IST

राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला

मुंबई : राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला मात्र सध्या अवकळा आली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त कार्यालय न्यायालयाच्या आदेशानुसार पाडले आहे. उरलेल्या भागात प्रदेश मुख्यालय कसेबसे तग धरून आहे. कार्यालयाचा दर्शनी भाग पूर्वीसारखाच असला तरी मागचे सगळे बांधकाम पाडण्यात आले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे सांगत नरिमन पॉइंट रहिवासी संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ते पाडण्याची मागणी केली होती. भाजपा कार्यालयाच्या मूळ जागेव्यतिरिक्तची ३० मीटरची जागा अवैधरीत्या कब्जात घेऊन हे बांधकाम करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. ते न्यायालयाने ग्राह्य धरले आणि भाजपाने हे अवैध बांधकाम पाडावे, असे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत महापालिकेकडून कारवाई होण्याच्या आत स्वत: भाजपानेच ते बांधकाम पाडले. त्यामुळे सध्या राज्यात नंबर वनवर असलेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे ‘बुरे हाल’ आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी हे कार्यालय आलिशान बांधण्यात आले होते. शंभरएक लोक बसू शकतील, असे छोटेखानी एसी सभागृह होते. पूर्वी वरच्या माळ्यावर गुप्त बैठकी चालायच्या. लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाची मात्र रया गेली आहे. कार्यालयातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही दक्षिण मुंबईतच मोठ्या कार्यालयासाठी जागा शोधत आहोत. दोन-तीन जागाही निवडलेल्या आहेत, पण कुठल्या एका जागेचे अद्याप नक्की झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)