शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू

By Admin | Updated: June 19, 2014 22:10 IST2014-06-19T21:46:33+5:302014-06-19T22:10:35+5:30

शाळेची घंटा पुन्हा २६ जूनला वाजणार असल्याने साहित्य खरेदीसह इतर लगबग सुरू झालेली दिसून येत आहे.

Start of shopping for school materials | शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू

शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू

डव्हा : जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून घराघरात तयारी सुरु होते ती शालेय साहीत्य खेरदिची नविन दप्तर काळीशार पाटी आणि कोर्‍या करकरीत वहया याची मजाच वेगळी असतो अगदी अभ्यासाचा कंटाळा असणार्‍या विद्यार्थ्यांपासून मोठया मानसापर्यंत सगळयानाच या खरेदीचा अनुभव घेण्यास खुप आवडते. शाळेची घंटा पुन्हा २६ जूनला वाजणार असल्याने साहित्य खरेदीसह इतर लगबग सुरू झालेली दिसून येत आहे.
येत्या २६ जूनपासून शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात पुन्हा चिवचिवाट व्हायला सुरुवात होणार आहे. नवीन दप्तर, वहया, वॉटर बॅग ,डब्बा, शुज ,ड्रेस आणि सोबत नव्या वर्गात जाण्याचा आनंद त्याच बरोबर नविन शिक्षक कसे असतील याची सुद्धा हुरहुर या सगळया शालेय जीवनातील अवीस्मरणीय आठवणी असतात. कॉलेज कुमारांनी देखील अडगळीत पडलेली सॅक शोधायला सुरुवात केली. शहरातील प्रत्येक ठिकाणी शालेय साहीत्य खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्याची गर्दी होत आहे. स्टेशनरीच्या दुकानात देखील शालेय साहीत्याच्या पाटया झळकत आहेत. २00 रुपयापासून शालेय दप्तर सध्या बाजारात उपलब्ध आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता वॉटरप्रुफ दप्तराकडे पालकांचा जास्त कल असल्याची व्यापारीवर्गानी सांगितले.

Web Title: Start of shopping for school materials