शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांत मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा

By admin | Updated: March 12, 2015 05:19 IST

येत्या दोन आठवड्यांत प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा, असे उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला खडसावले़

मुंबई: येत्या दोन आठवड्यांत प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा, असे उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला खडसावले़एकूण ३५ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांमध्ये फॉरेंसिक लॅब नसल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून आले होते. त्या वृत्ताची दखल घेत न्यायालयाने हा मुद्दा सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला़ तसेच प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात याची मिनी लॅब सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्यावर्षी दिले होते़ या लॅबची रिक्त पदे भरण्याचे व ४५ मोबाईल व्हॅन लॅब घेण्याचे निर्देशही न्यायालयाने शासनाला दिले होते़मात्र या आदेशाची अंमलबावणी झाली नसल्याचे न्या़ नरेश पाटील व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर स्पष्ट झाले़ याची अंमलबजावणी न झाल्याने मुंबईसह इतर जिल्ह्यातील लॅबवर ताण येत आहे़ या सर्व लॅबमध्ये सध्या अकरा हजार नमुने चाचणीच्या प्रतिक्षेत असल्याचेही अ‍ॅमक्यस क्युरी सारंग कोतवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने वरील आदेश दिले़गेल्यावर्षी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास गुन्ह्याचा तपास जलदगतीने होऊ शकेल़ मोबाईल लॅब तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ते नमुने घेऊन तपास वेगाने होऊ शकेल, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)