शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांकरिता स्वतंत्र बँका सुरू करा

By admin | Updated: September 7, 2015 01:53 IST

सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे

मुंबई : सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, अशी सूचना नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी रविवारी केली.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी युनुस यांची भेट घेऊन चर्चा केली. गरीबी निर्मूलनाकरिता बांगलादेशात राबवण्यात येत असलेल्या प्रयोगांची माहिती युनुस यांनी दिली. ग्रामीण बँकेचा प्रयोग, सूक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. जगभरातील बहुतांश गरीब समाज बँकींग क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता त्यांना बँकींग क्षेत्रात आणले पाहिजे. कर्जाची परतफेड गरिबांकडून जास्त प्रमाणात होते असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. याकरिता प्रस्थापित व्यावसायिक बँकांऐवजी गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करणे गरजेचे आहे.बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के सहभाग गरीब महिलांचा होता. या चळवळीत कर्ज परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के होते. या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबर आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या महिलांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ग्रामीण बँकेमार्फतच सामाजिक उद्योगाच संकल्पना राबवण्यात आली, असे युनुस यांनी सांगितले.गरिबांना दया दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा व महिला सक्षमीकरणाचा हा बांगलादेशातील प्रयोग महाराष्ट्रात अमलात आणण्यात येईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना सुपर हॅप्पीनेस ग्रुप बनवण्याकरिता शासन प्रयत्न करील, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)