शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डद्वारेही भरता येणार मुद्रांक शुल्क

By admin | Updated: September 30, 2015 00:55 IST

दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने आॅनलाईन दस्तनोंदणी सुरू केली. यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड

पुणे : दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने आॅनलाईन दस्तनोंदणी सुरू केली. यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड वा कॅश कार्डद्वारेदेखील दस्तनोंदणीचे मुद्रांक शुल्क भरता येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात ही सुविधा सुरू होईल, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने विविध सेवांची प्रक्रिया, त्यासाठी लागणारे शुल्क, कायदेशीर तरतुदी आदी माहिती आॅनलाईन सेवेद्वारे उपलब्ध करून दिल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दस्तनोंदणीच्या प्रचलित पद्धतीत मुद्रांक, मुद्रांक कागद, फ्रँकिंग, चलन, ई-स्टॅम्पिंग याशिवाय नोंदणी फीच्या बाबतीत धनाकर्ष, चलन आणि रोख रक्कम असे शंका घेण्यास वाव देणारे बरेच टप्पे होते. याला वेळ तर प्रचंड लागत होताच; शिवाय कागद व छपाईचा खर्चही प्रचंड होतो. नव्या पद्धतीत ई-पेमेंट ही एकमेव प्रक्रिया आहे. कमी वेळात दस्तनोंदणी पूर्ण होऊन खर्चात काटकसर करण्याचा हेतू आहे. (प्रतिनिधी)----------मुद्रांक शुल्क विभागात विविध कागदपत्रांसाठी अंतर्गत चलन भरावे लागते. त्याचे शुल्क रोख द्यावे लागते. ते रोख न देता आॅनलाईन जमा करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग प्रयत्नशील आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे अंतर्गत चलन बंद करून त्याचेही पैसे आॅनलाईन जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती एन. रामास्वामी यांनी दिली.