शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

...पण बदली नको रे बाबा! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मात्र सुरूच; प्रशासनाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 08:25 IST

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी संपाबाबत सोशल मीडियावरून विविध अफवा पसरविण्यात येत होत्या. या अफवा पसरविणे एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एसटी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता बदली झाल्याने या कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे तर खाजगी वाहन चालक प्रवाशांची लूट करीत आहेत. भरघोस वेतनवाढ देऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यभरातील २५० आगारांपैकी ६७ आगारांतील वाहतूक सुरू झाली आहे. मात्र संप अद्याप सुरूच आहे. त्यातील अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास इच्छुक आहेत; मात्र काही कर्मचारी त्यांना रुजू होऊ देत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग वाढवा म्हणून अफवा पसरविल्या जात आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे आता हाल होणार आहेत. या संपामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून यात प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

एकवेळ कारवाई परवडली; पण बदली नको रे बाबा ! एसटी कर्मचारी आपल्या गावाजवळच्या ठिकाणी कामाला आहेत. त्यामुळे त्यांना शेती आणि इतर व्यवसायांतही लक्ष देता येते. पण, तीन ते चार तास अंतराच्या ठिकाणी बदली केल्यास त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे एक वेळ निलंबनाची कारवाई चालेल; पण बदली केल्यास अडचणी वाढतील, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगरसह राज्यातील इतर विभागांनी या बदल्या केल्या आहेत.

एका आगार व्यवस्थापकाचे निलंबन एसटी संपाबाबत पोस्ट करताना परिवहन मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या एका आगार व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली असून, त्याचे निलंबन करण्यात आले आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संप