शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

एसटीच्या 189  निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; महामंडळाची बडतर्फीची कारवाई सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 8:57 AM

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी महामंडळाने सर्वाधिक अशा १८९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ३३३ वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने  ११,०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे.  महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन  आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. महामंडळाने आतापर्यंत ११,०२४  कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर २७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. 

त्यामुळे आता  निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. महामंडळाने आतापर्यंत ३०७९  कर्मचाऱ्यांना  बडतर्फीची कारणे दाखवा  नोटीस  बजावली आहे, तर आज  १८९  निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १३३३ वर पोहोचली आहे. 

५५,००० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा एसटी महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली तरी अद्यापही काही कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

टॅग्स :state transportएसटी