शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘एसी’च्या प्रवाशांना एसटीचे चटके

By admin | Updated: May 29, 2014 03:19 IST

एसटी महामंडळाचा कारभार सध्या गोंधळातच सुरू असून त्याचा प्रत्यय एसी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना येत आहे.

मुंबई : एसटी महामंडळाचा कारभार सध्या गोंधळातच सुरू असून त्याचा प्रत्यय एसी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना येत आहे. मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त होत असलेल्या एसी बसेसवर कुठलाही तोडगा न काढता त्याच बसेस पुन्हा एक वर्ष तरी प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे. टेंडर (निविदा) काढताना त्यामध्ये तीन वेळा बदल करण्याचा प्रताप महामंडळाने केल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत असल्याचे उघड झाले आहे. एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी बसेस आहेत. यातील २५ बसेसची तीन वर्षांची मुदत असून ती कधीच संपली आहे. या बसचे कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्या कंत्राटदारांना त्यांचे कंत्राट वाढवून मिळत नव्हते. त्यामुळे त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत या २५ बसेस वार्‍यावर सोडण्याचे काम कंत्राटदारांकडून करण्यात आले आणि या बसेसची अवस्था खूपच बिकट झाली. १ जानेवारी २0१४ रोजी २0 फेब्रुवारीपर्यंत २५ एसी बसची दुरुस्ती आणि त्यात बदल करून त्या पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत झाला होता. आणखी १० नवीन एसी बस घेण्यात येणार होत्या. त्यासाठी टेंडरच्या अटींमध्ये बदल करण्यात आले. मात्र, टेंडरच्या नियमात पडलेले बदल एसटीच्याच पथ्यावरच पडल्यानंतर कंत्राटदारांनी तीन वर्षांची मुदत संपताच त्याकडे दुर्लक्ष केले आणि या बसेसची अवस्था बिकट होत गेली. त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुन्हा बदल करत पात्रता अट शिथिल केली. मात्र, हादेखील बदल न रुचल्याने १० दिवसांनी अटीत पुन्हा बदल करण्याचा प्रताप एसटी महामंडळाने केला आणि टेंडर नव्याने काढले. टेंडरमधील बदल कंत्राटदारांना न रुचल्याने अखेर टेंडर रद्दच करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जुन्याच कंत्राटदारांना टेंडर देऊन त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे एसी बसकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर नादुरुस्त बसेस प्रवाशांच्या माथी मारल्या जात असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)