शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Ashadhi Ekadashi: आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या ३ हजार ७२४ जादा बस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 7:00 AM

एसटीकडून आषाढी यात्रेसाठी दरवर्षी जादा बस सोडल्या जातात.

ठळक मुद्देदिवाकर रावते यांनी सोमवारी भोसरी येथील एसटीच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेमध्ये घेतली बैठक उपहारगृह, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका या सुविधाही दिल्या जाणारएसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे अहोरात्र कार्यरत माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी ३ हजार ७२४ जादा बसचे नियोजन केले आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या बससह या जादा बसचा ताफा भाविकांसाठी उपलब्ध असेल. यात्राकाळात विविध विभागात तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार असून त्यासाठी उपहारगृह, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका या सुविधाही दिल्या जाणार आहेत.आषाढी यात्रेनिमित्त वाहतुक नियोजनासाठी परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी भोसरी येथील एसटीच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेमध्ये बैठक घेतली. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी एसटीकडून दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. त्यानुसार या बैठकीमध्ये ३ हजार ७२४ जादा बसच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे दि. १० ते १६ जुलै या कालावधीत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी माहिती रावते यांनी दिली.नियोजित ३ हजार ७२४ बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाºया विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. जादा बस सोडण्यासाठी एसटीकडून ठिकठिकाणी तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे. या स्थानकांवर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस या यांत्रिक दृष्ट्या निदोष, तंदुरुस्त असल्या पाहिजे तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहण्याच्या सुचना रावते यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.  ..............विभागनिहाय जादा बसेसचे नियोजन विभाग                        जादा बसऔरंगाबाद                     १०९७पुणे                              १०८०नाशिक                         ६९२अमरावती                      ५३३मुंबई                             २१२नागपूर                          ११०

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी