शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:13 PM

SSC Result 2020 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं कारण समोर आलं आहे.

पुणे - राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (२९ जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८. ७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे.

यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी SSC चा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकाल जास्त लागला. राज्यात फक्त ५ टक्के मुलं नापास झाली आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई ,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३  ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामूळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. मात्र, कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले. 

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी राज्याचा दहावीचा निकाल जाहीर केला. या प्रसंगी राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह ) पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला.

मागील वर्षी मार्च २०१९ मध्ये ८०: २० पॅटर्न रद्द करून सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती. परंतु , राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के असून कोकणनंतर विभाग कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यातील १५ लाख  ८४ हजार  २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३  विद्यार्थ्यांपैकी १५ लाख  १ हजार  १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालssc examदहावीStudentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवसexamपरीक्षा