CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:37 AM2020-07-29T11:37:06+5:302020-07-29T11:48:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. पाटण्याचे गौरव सिन्हा यांनी कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. 

CoronaVirus Marathi News man starts own oxygen cylinder bank corona patients | CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढला असून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत देशभरात 34,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस जीवाची पर्वा न करता दिवस रात्र कष्ट करत आहेत. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. पाटण्याचे गौरव सिन्हा यांनी कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. 

कोरोनाग्रस्तांसाठी गौरव सिन्हा यांनी ऑक्सिजन बँक सुरू केली असून  यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' संजीवनी देण्याचं महत्त्वाचं काम करत आहे.  ऑक्सिजन बँकच्या माध्यमातून ते कोरोना रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याचे काम करतात. जेव्हा सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही सुविधा मिळत नाही आणि त्यांची जेव्हा गौरव यांना माहिती मिळते, तेव्हा ते स्वत: त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन पोहोचतात. कोरोनावर मात करून ते मदतीसाठी तत्पर असतात. 

गौरव यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. गौरव यांच्या पत्नीने त्यांना तातडीने एका रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची त्वरित व्यवस्था होऊ शकली नाही. गौरव यांची पत्नी अरुणा यांनी बर्‍याच प्रयत्नांनंतर कसा तरी ऑक्सिजन सिलिंडर मिळवला. तेव्हा गौरव यांच्या स्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे गौरव यांनी ऑक्सिजन बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

गौरव यांच्याकडे जवळपास 30 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. लोकांनी गौरव यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते त्याला ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध करून देतात. गौरव हे विशेषतः वृद्ध रुग्णांना  प्राधान्य देतात. गौरव सिन्हा यांनी आतापर्यंत 86 वेळा रक्तदान केले आहे. त्याच्या पत्नीही बँकेत नोकरी करतात. त्यांचा देखील गौरव यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा आहे. गौरव यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

Web Title: CoronaVirus Marathi News man starts own oxygen cylinder bank corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.