शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

By admin | Updated: August 5, 2016 01:08 IST

२ वर्गांच्या स्लॅबचा काही भाग बुधवारी (दि. ३) रात्री कोसळल्याने या वर्गांतील बाकांचे व दरवाजांचे नुकसान झाले आहे.

येरवडा : कल्याणीनगरमधील डॉ. मिसेस एरीन एन. नगरवाला हायस्कूलच्या इमारतीमधील २ वर्गांच्या स्लॅबचा काही भाग बुधवारी (दि. ३) रात्री कोसळल्याने या वर्गांतील बाकांचे व दरवाजांचे नुकसान झाले आहे. ही घटना शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या सुमारास घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ४) पालक व विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. मात्र, शाळेच्या आवारात पालकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच याबाबत कुठलीही माहिती दिली जात नसल्याने घटनेबाबत गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून करण्यात येत होता. पालकांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. विशेष म्हणजे या शाळेकडून पोलिसांनाही माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळेला सूचना केल्या जातील, असे येरवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी सांगितले. दरम्यान, मनसेचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मोहनराव शिंंदे-सरकार व अच्युतराव मोळावडे यांनी गुरुवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शाळेची वेळ संपल्याचे सांगून आतमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. दिवसभरात काही पालकांनीही शाळेची पाहणी करण्याची केलेली मागणीही शाळेकडून नाकारण्यात आली. दरम्यान, शाळेने गुरुवारी विद्यार्थ्यांकरवी पालकांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये देखभाल दुरुस्तीच्या तातडीच्या कामासाठी शुक्रवारी (दि. ५) एलकेजी ते सातवीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या सलग ३ दिवसांमध्ये स्लॅब पडलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. याबाबत विद्यालयाच्या कार्यालयीन दूरध्वनीवर, प्राचार्या जस्मिन दलाल यांच्याशी संपर्क साधला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. (वार्ताहर)>‘स्ट्रक्चरल आॅडिट’ची मागणी मनसेचे मोहनराव शिंंदे-सरकार म्हणाले, की या शाळेची इमारत जुनी झाली आहे. सुदैवाने वर्गात विद्यार्थी नसताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने याबाबत कसलीही तडजोड केली जाऊ नये. या इमारतीचे पालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी आपण आयुक्तांची भेट घेणार आहोत, तसेच यासाठी शाळा प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. शाळेकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास ‘मनसे स्टाईल’ने शाळेला धडा शिकवला जाईल.