शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या भाडेवाढीला विशेष समितीची मंजुरी

By admin | Updated: February 12, 2015 05:50 IST

बेस्टपाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवेनेदेखील (टीएमटी) आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपये

ठाणे : बेस्टपाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवेनेदेखील (टीएमटी) आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपये तर शेवटच्या टप्प्यासाठी पाच रुपये भाडेवाढ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव परिवहनच्या विशेष समितीने मंजूर केला आहे. आता तो पुढील मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला जाणार आहे. ही भाडेवाढ तीन ते चार महिन्यांनंतर लागू होणार आहे. दोन वर्षांपूर्वी मार्च २०१३ मध्ये परिवहनने पहिल्या टप्प्यासाठी १ रुपयाची भाडेवाढ केली होती. नव्या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यासाठी २ रुपये, त्यानंतरच्या पुढील टप्प्यासाठी ३ रुपये आणि त्यानंतरच्या टप्प्यासाठी ५ रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांत डिझेलचे दर कमी झाले असले तरी टायर, स्पेअरपार्टचे दर वाढल्याने दरवाढ प्रस्तावित केल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. वातानुकूलित बसचीदेखील भाडेवाढ होणार असून पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपये, दुसऱ्या टप्प्यासाठी १० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. परिवहनचे सुरुवातीचे साध्या बसचे भाडे हे ५ रुपये आहे. आता त्यासाठी ७ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ११ ऐवजी १३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १० किमीच्या पुढे १८ रुपयांऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. एसी बसचे सध्या पहिल्या टप्प्याचे भाडे १५ असून ते आता २० रुपये होणार आहे. तर शेवटच्या टप्प्याचे भाडे ७५ वरून ८५ रुपये होणार आहे. तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)