शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 28, 2015 02:05 IST

तापमान वाढल्याने उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनचे उत्पादन घटण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोला : यावर्षी पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने विदर्भातील पेरणीला विलंब झाला असून, पाऊस येईल, या आशेवर जुलै, ऑगस्ट महिन्यात पेरलेल्या सोयाबीनला शेंगा कमी लागल्या आहेत. त्या शेंगाही अपरिपक्व असल्याने या शेंगा परिपक्व होण्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान, पावसानंतर एकदम तापमान वाढल्याने उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनचे उत्पादन घटण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी विदर्भात जवळपास १९ लाख हेक्टरच्यावर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. यातील २0 टक्केच्यावर पेरणी ही जून महिन्याच्या पावसात झाली आहे. हे सोयाबीन आता परिपक्व झाले असून, शेंगा वाळण्याच्या स्थितीत आहेत; परंतु जुलै, ऑगस्टमध्ये पेरणी केलेल्या शेंगामध्ये दाणे भरले नसून, या शेंगांना बाधा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसामुळे या सोयाबीनला अल्पसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात घट होईल. या सोयाबीनची वाढ झाली नाही; परंतु शेंगा आल्या असून, त्या अपरिपक्व असल्याने शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु जूनच्या प्रथम पावसानंतर ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली ते सोयाबीन परिपक्व झाले आहे. आता पाऊस आल्यास त्या सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता असल्याने सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली असून, या खुंटलेल्या झाडांना ज्या काही शेंगा धरल्या, त्या परिपक्व होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. कारण सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसानंतर तापमानात वाढ झाली असून, या पिकांना तापमानाचा शॉक बसला आहे. अशावेळी उशिराच्या सोयाबीनचे उत्पादन तर निघणार नाहीच, उलट रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असेल, तर त्यावरही परिणाम होईल आणि कापसाच्या पात्या-फुले गळण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंदेकृवि अंतर्गत असलेल्या प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मोहनराव खाकरे यांनी स्पष्ट केले.