दक्षिण, संपर्कक्रांती एक्स्प्रेस रोखली

By Admin | Updated: August 25, 2014 01:09 IST2014-08-25T01:09:53+5:302014-08-25T01:09:53+5:30

मानकापूर रेल्वेगेट बंद करू नये या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी आज रविवारी सायंकाळी ५.२० वाजता आंदोलन करून संपर्कक्रांती आणि दक्षिण एक्स्प्रेस सुमारे एक तास रोखून धरली.

South, Kankranti Express is blocked | दक्षिण, संपर्कक्रांती एक्स्प्रेस रोखली

दक्षिण, संपर्कक्रांती एक्स्प्रेस रोखली

मानकापूर गेट सुरू ठेवा : १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : मानकापूर रेल्वेगेट बंद करू नये या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी आज रविवारी सायंकाळी ५.२० वाजता आंदोलन करून संपर्कक्रांती आणि दक्षिण एक्स्प्रेस सुमारे एक तास रोखून धरली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलनकर्त्या १० नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मानकापूर येथे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत रेल्वे किलोमीटर क्रमांक २९४ येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपूल तयार झाल्यानंतर रेल्वे पूर्वीचे लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करते. उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वेने मानकापूरचे गेटही बंद केले. परंतु हे गेट बंद केल्यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच संतापले. जवळपास ५०० नागरिक या गेटजवळ पोहोचले. त्यांनी १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस आणि १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टनम दक्षिण एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या मानकापूर गेट क्रमांक २९४ जवळ सायंकाळी ५.२० वाजता रोखून धरीत हे रेल्वेगेट बंद न करण्याची मागणी केली. दोन्ही गाड्या रोखून धरल्याची बाब रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला रेल्वेगेटजवळून बाजूला करण्यास सुरुवात केली. तब्बल एक तासानंतर जमावाला पांगवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर या दोन्ही गाड्या आपल्या पुढील प्रवासाला रवाना झाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: South, Kankranti Express is blocked