शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या बाकांसमोर सूप वाजले!

By admin | Updated: December 25, 2014 02:06 IST

हजारो कोटींच्या घोषणा आणि विरोधकांच्या बहिष्कारामुळे रिकाम्या बाकांकडे बघत मंत्र्यांनी दिलेली उत्तरे,

अतुल कुलकर्णी , मुंबईहजारो कोटींच्या घोषणा आणि विरोधकांच्या बहिष्कारामुळे रिकाम्या बाकांकडे बघत मंत्र्यांनी दिलेली उत्तरे, अशा वातावरणात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदा १३ दिवस चाललेले हे पहिले अधिवेशन ठरले. मात्र विरोधीपक्षानी शेवटच्या दिवशी कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकून नवाच पायंडा पाडला. मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून विरोधकांनी मंगळवारीच बहिष्काराचे अस्त्र उपसले होते. सभागृहात मंत्र्यांनी उत्तरे द्यायची असतात, प्रश्न विचारायचे नसतात. पण मुंबईवरील लक्षवेधीची चर्चा असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उत्तर देत होते. मात्र ते स्वत:च म्हणाले, माझाही एक प्रश्न आहे! ज्यांची लक्षवेधी आहे ते सदस्य सभागृहात नसतील तर ती चर्चेला घेतली जात नाही; मात्र अन्य सदस्यांना त्यावर बोलायचे आहे , असे सांगत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चर्चा घडवून आणत आणखी एका नव्या प्रथेला जन्म दिला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य सकाळी विधानभवनात आले मात्र बाहेर माध्यमांशी बोलून त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. निलंबन मागे घेण्यात आलेले आमदारही आज विधानभवनात आले होते; मात्र बहिष्कारामुळे त्यांना सभागृहात जाता आले नाही. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आजही दिवसभर सभागृहाबाहेर गाजला. विधानपरिषदेतील विरोधीपक्षाचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत होते. प्रथेप्रमाणे याहीवर्षी बेळगाव सीमा प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यावर जोरदार चर्चा झाली आणि सरकार सीमा वासियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे वर्षानुवर्षे चालत आलेले उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.