शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सोहराबुद्दीन चकमक; शहा दोषमुक्त

By admin | Updated: December 31, 2014 09:59 IST

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणातून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले़

मुंबई : गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणातून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले़गुजरात पोलिसांनी ही बनावट चकमक घडवून आणली तेव्हा शहा गुजरातचे गृहमंत्री होते़ या घटनेच्या वेळी ते एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा सीबीआयचा दावा होता़ तसेच शहांविरोधात कट, हत्येसाठी अपहरण करणे, बेकायदापणे ताब्यात ठेवण्यासाठी अपहरण करणे यासह विविध आरोप ठेवण्यात आले होते़ सीबीआय शहा यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर करू शकली नाही, असा निष्कर्ष नोंदवत विशेष सीबीआय न्या़ ए़ बी़ गोसावी यांनी शहा यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले़ आदेशाच्या तपशीलवार प्रतीवर न्यायाधीशांची स्वाक्षरी न झाल्याने यात न्यायालयाने नोंदविलेली इतर निरीक्षणे उपलब्ध झालेली नाहीत़ गुजरात येथे २००५ मध्ये झालेल्या बनावट चकमकीचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचेही नंतर पोलिसांनी एन्काउंटर केले़ यात अमित शहा व गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर समावेशाचा ठपका ठेवत सीबीआयने याचे आरोपपत्रही दाखल केले़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला सुनावणीसाठी मुंबईत वर्ग करण्यात आला़विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू असताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा अर्ज शहा यांनी केला होता़ गुजरातचा गृहमंत्री असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी होती़ त्या हेतूने मी सतत पोलिसांच्या संपर्कात असायचो, मात्र या एन्काउंटरशी माझा काहीही संबंध नाही़ या प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी विनंती शहा यांनी अर्जात केली होती़ याला सोहराबुद्दीन याचा भाऊ रुबाबुद्दीन तसेच सीबीआयचा देखील शहा यांच्या अर्जाला विरोध होता़बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून, याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ सीबीआय सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे़ - वृत्त /१0