शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सोशल मीडियातून फसवणुकीचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:12 AM

परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मीडियावर विशेषकरून फेसबुकवर सुरू आहे.

- विहार तेंडुलकर रत्नागिरी : परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मीडियावर विशेषकरून फेसबुकवर सुरू आहे. त्यामध्ये काही जण फसले गेल्याचेही रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या झालेल्या फसवणुकीवरून दिसून आले. या प्रकरणात एक टोळकेच सामील असावे, असा संशय जाणकारांना आहे.झारी यांच्यासोबतच शहरातील एका नागरिकालाही असाच अनुभव आला असून मात्र तो वेळीच सावध झाल्याने त्याची आर्थिक फसवणूक टळली. तवंगर जमादार झारी यांची ज्या तरुणीने फसवणूक केली, त्या तथाकथित प्रिस्का विल्यम्स हिची आणखी एक फेसबुक प्रोफाइल असून ती या प्रोफाइलवर मेरी जॉन्सन स्मिथ (लंडन) या नावाने कार्यरत आहे. या दोन्ही प्रोफाइलवरील फोटो एकच आहे. या दोन्ही अकाउंटवरून नागरिकांशी मैत्रीचे नाटक करून फसवणूक केली जात आहे.याबाबत फसवणूक टळलेल्या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, जाळ्यात ओढण्यासाठी तुमच्यामुळे मला नोकरीत बढती मिळाली म्हणून मी आपल्यावर खूश होऊन महागड्या भेटवस्तू देत आहे, असे मेरी नावाच्या या तरुणीने सांगितले. त्यानंतर महागड्या वस्तू खरेदी केल्याचे सांगून त्याचे फोटो, वस्तूचे पॅकिंग, एवढेच नव्हे तर कुरिअर केल्याची पावतीही पाठवली. ज्या दिवशी कुरिअर भारतात पोहोचणार, त्याच दिवशी फोन आला आणि त्यांनी कुरिअर कंपनीच्या बँक खात्यात २६ हजार ५०० रुपये भरल्यावर आपले कुरिअर घरपोच केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र आपण आपले पार्सल पोहोच झाल्यानंतरच पैसे भरू, असे सांगितले. मात्र तत्पूर्वी त्याने त्या कुरिअरचा अकाउंट नंबर नोंदवला.या अकाउंटची माहिती घेतली असता फोन करणारी कुरिअर कंपनी दिल्लीतून फोन केल्याचे भासवते आणि पैसे भरण्यासाठी दिलेला बँक अकाउंट नंबर हा बंगळुरू येथील असल्याचे दिसून आले. यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.>फेसबुक वापरणाऱ्यांनो, या गोष्टींची काळजी घ्या!परदेशातून येणारा कोणताही माल हा कस्टम खात्याच्या तपासणीनंतरच दिला जातो. कोणतीही कुरिअर कंपनी अकाउंटमध्ये पैसे भरण्यास सांगत नाही. कस्टम खात्यातही हे पार्सल सर्वांसमक्ष फोडून आतील मालाचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानंतर त्यावर कस्टम ड्यूटी आकारली जाते.परदेशातून बोलणारी तरुणी ही व्हॉट्सअ‍ॅप नंबर हा परदेशी असल्याचे भासवते. परंतु हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर परदेशात कार्यान्वित केला जातो आणि त्याचा वापर मात्र भारतात केला जातो. त्यामुळे या परदेशी नंबरवर अनेक वेळा कॉलही होत नाही.तरुणीकडून केलेला व्हिडीओ कॉलही बनावट असतो. हा कॉल रेकॉर्ड करून आपल्या कॉलवेळी मोबाइलसमोर ठेवला जातो. हा कॉलही केवळ काही सेकंदाचाच असतो. आपण बिझी असल्याचे सांगून फोन कट केला जातो.

टॅग्स :Facebookफेसबुक