शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ढोलाच्या नादातून सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: September 6, 2016 01:18 IST

तरुणाईला विधायक दिशा देणाऱ्या ढोल खेळाचा खेड तालुक्यातील युवकांना चांगलाच ‘नाद’ लागला आहे

काळूस : तरुणाईला विधायक दिशा देणाऱ्या ढोल खेळाचा खेड तालुक्यातील युवकांना चांगलाच ‘नाद’ लागला आहे. खेळाच्या सुपाऱ्यांच्या पैशातून स्वत: बरोबरच गावाच्या विकासाचे अर्थकारण बदलू शकत असल्याचे विधायक चित्र तालुक्यातील सुमारे १५० ढोल पथकांनी दाखवून दिले आहे. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत निराधारांच्या मदतीला पथकांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यासह वाकी, रोहोकल, चांदूस भागातील ढोल पथकांच्या सरावाचा नाद सध्या चांगलाच घुमतोय. तालुकाभरात वांद्रा, अंबोली, विराम, गडद, आडे, सुपे, सातकरवाडी, हेंद्रुज, वाकी, रोहोकल शिवाय राजगुरुनगर शहरी भागातील ढोल पथकांची संख्या सुमारे १५० च्या घरात आहे. ढोलच्या एका पथकात सरासरी ४० ते ७० युवक असतात. खेळाला भेटणाऱ्या सुपारीची रक्कमही २५ ते ३० हजारांपासून २ ते ३ लाखांच्या घरात असते. पथकांचे सामाजिक भानकुणाचे लग्न, तर कुणाचे आजारपण, तर कधी एखाद्या गरजूच्या अंत्यविधीपासून दशक्रियेपर्यंतच्या खर्चासाठी मदत ढोल मंडळाच्या माध्यमातून होत असल्याचे पथकातील युवक अभिमानाने सांगतात. डीजेच्या कर्णकटू आवाजावर मद्यधुंद होऊन अश्लील चाळे करत नाचणाऱ्या तरुणांकडे पाहिल्यावर सामाजिक भान आणि जाण ठेवून सांस्कृतिक वारसा जपत एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे करत स्वत: बरोबरच समाजहित जपणाऱ्या या ढोलपथकातील युवकांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.निराधारांना पथकांचा आधारवाकी येथील भैरवनाथ ढोल पथकास २४ वर्षे पूर्ण झाली. पुढील वर्षी या मंडळाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. मंडळाचे सदस्य प्रशांत गवळी यांच्या लग्नात आर्थिक मदत, तसेच भाऊ यशवंत माकर् यांच्या मुलाच्या अपघातावेळी मंडळाने मदत केली. परिस्थिती नसलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा या खेळामुळे जपली जात असल्याचे अध्यक्ष नामदेव पारधी, धोंडिबा टिपरे, प्रशांत गवळी, भानुदास टोपे, संयोजक लक्ष्मण टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.