शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:59 AM

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत

मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७०वा वर्धापन दिन आणि वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोपानिमित्ताने परळमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.पाटील म्हणाले की, वसंतदादा यांच्या साधेपणात मोठेपणा होता. ते नेहमीच स्पष्ट बोलत. सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी कधी अट्टाहास केला नाही. उलट प्रसंगी सत्ता सोडण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. कोणताही निर्णय धाडसाने घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. या वेळी आरएमएमएसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही वसंतदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अहिर म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी आरएमएमएसचे अध्यक्षस्थान भूषवून संघटनेला नवी दिशा प्राप्त करून दिली. १९८२ च्या संपात बंद पडलेल्या मुंबईतील १३ गिरण्या त्या वेळच्या केंद्र सरकारला ताब्यात घेण्यास भाग पाडून हजारो कामगारांचे उद्ध्वस्त संसार वाचविले. मुंबईतील गिरणी कामगारापासून माथाडी कामगारांपर्यंतच्या सर्वच कामगारवर्गाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेद्वारे ‘मानव विकास व्यवस्थापन आणि उद्योगातील सातत्य’ या विषयावर नोकरीभिमुख अभ्यासक्रम सुरू करून राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची ग्वाही संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. मोहिते यांनी संघटनेच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. तर लोकनेते वसंतरावदादा पाटील सोशल फ्रंटचे अध्यक्ष यशवंत हाप्पे यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी