शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

कोयना परिसराला आतापर्यंत एक लाख वीस हजार धक्के !

By admin | Updated: December 10, 2015 23:44 IST

‘त्या’ भूकंपाला ४८ वर्षे पूर्ण : गुरुवारी सकाळीही सौम्य धक्का जाणवला

धीरज कदम -- कोयनानगरपाटण तालुक्यातील सर्वाधिक तीव्रतेच्या कोयना भूकंपाला शुक्रवार, दि. ११ रोजी ४८ वर्षे पूर्ण होत असतानाच गुरुवारी सकाळी याच परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ इतकी होती. दरम्यान, आतापर्यंत कोयना परिसराला एकूण एक लाख १९ हजार ९३४ इतके भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील पाच रिश्टर स्केलवरील धक्के हे नऊ होते हे विशेष आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. हे कोयना धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी इतकी आहे. या धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येते. या वीजनिर्मितीमुळे राज्यातील अनेक गावे अन् शहरे उजळून निघाली आहेत. तसेच कोयना धरणातील पाण्याचा शेतीसाठीही फायदा होत आहे. अशा या कोयना धरण व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कोयना धरण झाल्यानंतर दि. ११ डिसेंबर १९६७ साली येथे भूकंपाचा ७ रिश्टर स्केलपेक्षाही जास्त तीव्रतेचा धक्का जाणवला. त्यावेळच्या भूकंपात कोयना व परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले होते. सुमारे १५० लोक मृत्यूमुखी पडले होते. ५० गावांचे पूनर्वसन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. त्यानंतरही या कोयना धरण परिसरात अनेकवेळा भूकंपाचे सौम्य, मध्यम असे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे कोयना व परिसर हे भूकंपाचे केंद्रच बनले असल्याचे दिसून येत आहे. कोयना भूकंपाला ४८ वर्षे पूर्ण होत असतानाच आतापर्यंत या परिसराला एकूण एक लाख १९ हजार ९३४ इतके धक्के जाणवले आहेत. त्यामध्ये तीन रिश्टर स्केलपेक्षा लहान एक लाख १८ हजार १९७ धक्के जाणवले. तीन पेक्षा अधिक व चार पेक्षा कमी रिश्टरचे १६३५, चार पेक्षा मोठे व पाच पेक्षा लहान रिश्टर स्केलचे ९३ धक्के जाणवले. त्याचबरोबरच पाचपेक्षा अधिक रिश्टर स्केलचे नऊ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कोयना व परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असतात. तसेच पाटण, कऱ्हाड, सातारा इथपर्यंतही हे धक्के जाणवलेले आहेत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कोयना परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ इतकी होती. हा भूकंप कोयनेपासून १२ कि.मी अंतरावर आणि गोषटवाडीच्या नैऋत्येला ७ किमीवर झाला. तसेच या भूकंपाची खोली ९ कि.मी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. यामुळे मात्र, दि. ११ डिसेंबर १९६७ साली झालेल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.