शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकसह गोव्यात सहा पथके रवाना

By admin | Updated: June 8, 2015 01:26 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा पथके शनिवारी रात्रीच कर्नाटकसह गोव्यास रवाना झाली आहेत.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा पथके शनिवारी रात्रीच कर्नाटकसह गोव्यास रवाना झाली आहेत. तसेच दोन पथके स्थानिक पातळीवर तपास करीत आहेत. प्रत्येकास स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे, अशी माहिती ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी रविवारी दिली. पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयामध्ये आठ विशेष पथकांच्या प्रमुखांबरोबर संजयकुमार यांची बैठक झाली. पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे (स्केचेस) एसआयटीने तयार केली असून त्या आधारे मारेकऱ्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचा सूचना पथकांना दिल्या असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. मारेकरी सुभाषनगर रोडवरून भरधावपणे शिवाजी विद्यापीठमार्गे कागलच्या दिशेने निघून गेले असल्याचे धीरज कन्स्ट्रक्शन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गावर कोठे-कोठे सीसीटीव्ही आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यांचे फुटेज उपलब्ध करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी मारेकऱ्यांनी दूधगंगा नदीमध्ये दुचाकी टाकून ते परत कोल्हापुरात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ते कर्नाटक किंवा गोवा राज्यांतही आश्रयाला जाऊ शकतात. त्यामुळे कर्नाटक व गोवा राज्यांतील काही प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्हीचे फुटेजही मिळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) मारेकऱ्यांची रेखाचित्रे संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे राज्यभरातील सराईत गुन्हेगार, शार्प शूटर, सुपारी किलर तसेच कारागृहांत असलेल्या कैद्यांना दाखविण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे संजयकुमार यांनी या वेळी सांगितले.