अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री...

By मुकेश चव्हाण | Published: October 4, 2023 02:28 PM2023-10-04T14:28:23+5:302023-10-04T14:53:51+5:30

पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

Six people of Ajit Pawar group have been given the guardian minister post, see guardian ministers of all districts in the state | अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री...

अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री...

googlenewsNext

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. याआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होते. मात्र पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

अजित पवार गटाच्या सहा जणांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

१. अजित पवार- पुणे
२. दिलीप वळसे-पाटील- बुलढाणा
३. धनंजय मुंडे- बीड
४. अनिल पाटील- नंदुरबार
५. हसन मुश्रीफ- कोल्हापूर
६. धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया

राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे आहेत-

  • देवेंद्र फडणवीस- नागपूर, गडचिरोली
  • अजित पवार- पुणे
  • राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, अकोला
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, वर्धा
  • चंद्रकांत दादा पाटील- सोलापूर, अमरावती
  • विजयकुमार गावित- भंडारा
  • गिरीश महाजन - धुळे, लातूर, नांदेड,
  • गुलाबराव पाटील -  जळगाव
  • दादा भुसे - नाशिक
  • संजय राठोड - यवतमाळ, वाशिम
  • दिलीप वळसे-पाटील- बुलढाणा
  • धनंजय मुंडे- बीड
  • अनिल पाटील- नंदुरबार
  • हसन मुश्रीफ- कोल्हापूर
  • धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया
  • सुरेश खाडे - सांगली
  • संदिपान भुमरे - छत्रपती संभाजीनगर
  • उदय सामंत - रत्नागिरी, रायगड,
  • तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग,
  • अब्दुल सत्तार - हिंगोली,
  • दीपक केसरकर - मुंबई शहर
  • अतुल सावे - जालना
  • शंभूराज देसाई - सातारा, ठाणे
  • मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results

Web Title: Six people of Ajit Pawar group have been given the guardian minister post, see guardian ministers of all districts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.